Your Language
पीसीओएसविषयीची सत्य माहिती पुरविणे
+ पीसीओएस काय आहे?
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) ही पुनरुत्पादक वयादरम्यान असणाऱ्या (वयवर्षे 15-45) महिलांना भेडसवणारी सध्याची एक सर्वाधिक सामायिक समस्या आहे. भारतात अशा वयातील सुमारे 36% महिला लोकसंख्येला पीसीओएसचा त्रास होतो किंवा अचूकपणे प्रत्येकी 4 पैकी 1 महिलेला पॉलिसिस्टिक ओव्हरीज होतो. सद्य परिस्थितीतील कोणत्याही सामाजिक किंवा प्रसिद्धी माध्यमांच्या आघाडीवर पीसीओएस हा महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेत असलेला एक विषय आहे. ही समस्या अतिशय सामायिक आहे आणि आपल्यापैकी कोणालाही होऊ शकते. पीसीओएसवर मात करण्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्या किचकट समस्या टाळण्यासाठी कोणत्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला माहिती होण्याची गरज आहे हे आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्यावर उपचार करण्यात आले नाहीत तर त्यामुळे वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे) येऊ शकते.

पीसीओएसची लक्षणे
 • पुरळ/मुरूमे आणि हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे)>
 • लठ्ठपणा/वजन वाढणे
 • अनियमित मासिक पाळी
 • पिगमेन्टेशन (रंगद्रव्याच्या थरामुळे त्वचेला आलेला रंग), खास करून मानेवर व काखेत
 • पॉलिसिस्टिक ओव्हरीजची (अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात)-अल्ट्रा सोनोग्राफी (यूएसजी) द्वारे खात्री देता येऊ शकते.

पीसीओएसच्या लक्षणांना लवकर सुरूवात होऊ शकते, बहुतेक बाबतीत किशोर अवस्थेतील उशीराच्या आणि प्रौढपणाच्या सुरूवातीच्या टप्प्यात हि लक्षणे दिसू शकतात. पीसीओएस चे बहुतेक वेळा पुरळ/मुरूमे आणि हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) ह्यासारख्या दिसून येणाऱ्या लक्षणांवरून चुकीचे रोगनिदान केले जाते किंवा कॉस्मेटॉलॉजिकल बाबी म्हणून स्वत:च रोगनिदान केले जाते.

मोठ्या प्रमाणात महिलांना त्यांच्या मासिक चक्राच्या समस्या झाल्याखेरीज किंवा त्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येईपर्यंत त्यांना पीसीओएस झाला आहे हे माहित किंवा समजत देखील नाही.

1) पॉलिसिस्टिक ओव्हरीज (अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात)
प्रत्येक महिलेला दोन अंडाशय असतात ज्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना असतात. प्रत्येक अंडाशय साधारण एका मोठ्या गोटीच्या आकाराचे असते. अंडाशयात अंडी आणि वेगवेगळी संप्रेरके तयार होतात.
साधारणपणे, प्रत्येक मासिक पाळी दरम्यान, अंडाशयात अनेक लहान कोशाची वाढ होते आणि अंडी तयार होतात. पाळीच्या मध्यभागी, एका अंडाशयातून बीजवाहिनेत एक अंडे सोडले जाते. याला 'ओव्हुलेशन' प्रक्रिया असे म्हणतात. इतर कोश अधिक परिपक्व होतात आणि फुटतात.
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, ओव्हुलेशन होत नाही आणि अंडी मुक्त केली जात नाही. कोश फुटत नाहीत, परंतु ते द्रवपदार्थाने भरतात आणि पोकळ गाठी होतात ज्या एखाद्या द्राक्षाच्या घडासारख्या दिसतात. अंडाशय फुगल्यामुळे, कधीकधी ते सामान्य प्रमाणापेक्षा दोन ते पाच पट मोठे होतात.
तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहे की नाही हे निश्र्चित करण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.

2) अनियमित मासिक पाळी:
पुनरुत्पादक वयातील महिलेचे मासिक चक्र सरासरी 28 दिवसांचे असते, पण ते 25 ते 35 दिवसांच्या दरम्यान असू शकते. पीसीओएस महिलांमध्ये, मासिक पाळी साधारणपणे >35 दिवसांच्या (अनियमित मासिक पाळी) कालांतराने येते किंवा येत नाही.
आपण अगदी अलिकडच्या अभ्यासांचा विचार केला तर पीसीओएस असलेल्या सुमारे 99% महिलांची मासिक पाळी अनियमित असते.
तुमचे मासिक चक्र अनियमित असल्यास, खूप उशीर होण्यापुर्वी उपाययोजना करा आणि कृपया तुमच्या डॉक्टरांचा शक्य तितक्या लवकर सल्ला घ्या.3) पुरळ/मुरूमे आणि हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे):
पुरळ आणि हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) ही एक पीसीओएसची सर्वाधिक सामायिक दिसून येणारी लक्षणे आहेत. हर्सुटिजम म्हणजे केसांची जास्त प्रमाणात वाढ होणे, जी साधारणपणे नितंब, पाठ, छाती किंवा चेहऱ्यावर होते. पुरळ हा त्वचेचा रोग असतो ज्यात मुरम्यांसारख्या लहान पुटकुळया तयार होतात. पुरळ/मुरूमे साधारणपणे चेहरा, पाठ आणि छातीवर येतात. पीसीओएस असलेल्या सुमारे 75% महिलांना हर्सुटिजम असतो आणि पीसीओएस असलेल्या सुमारे 34% महिलांना पुरळ/मुरूमे होतात.
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, अंडाशयातील गाठीमुळे संप्रेरकांचा असमतोल होतो त्यामुळे पुरूषी संप्रेरकांचे (उदा. टेस्टोस्टेरोन) उत्पादन अधिक प्रमाणात होते. पुरूषी संप्रेरकांमध्ये अधिक प्रमाणात वाढ होण्यामुळे पुरळ/मुरुमे आणि हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे).


4) लठ्ठपणा/वजन वाढणे:
लठ्ठपणा किंवा सतत वजन वाढणे हे पीसीओएसचे वैशिष्ट्य आहे. पीसीओएसच्या सुमारे 50% महिला लठ्ठ असतात. खाण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पीसीओएस असलेल्या महिला अधिक लठ्ठ होतात.
पीसीओएसच्या महिलांमध्ये लठ्ठपणा हा एक सामायिक निकष आहे कारण त्यांच्या शरीरातील पेशी साखर/ग्लुकोजवर नियंत्रण ठेवणाऱ्या इन्सूलिन (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) नावाच्या संप्रेरकाला प्रतिकार करतात. ह्या इन्सूलिनच्या (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याच्या) प्रतिकारामुळे पेशींना साखरेचा/ग्लुकोजचा उपयोग करण्यास प्रतिबंध केला जातो जी चरबीच्या स्वरूपात H^ साठविली जाते व अशा प्रकारे त्यामुळे लठ्ठपणा येतो किंवा वजन वाढते.
लठ्ठपणामुळे मासिक पाळीवर परिणाम होणाऱ्या संप्रेरकांमध्ये देखील असमतोल होतो. तुम्ही लठ्ठ असल्यास किंवा तुमचे वजन अधिक असल्यास, वजन कमी करण्याचा आणि आरोग्यसंपन्न आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

5) पिगमेन्टेशन (रंगद्रव्याच्या थरामुळे त्वचेला आलेला रंग), खास करून मानेवर आणि काखेत:
पीसीओएस असलेल्या महिलांना मानेच्या मागच्या भागावर, काखेत, कपाळ, कदाचित शरीराच्या एखाद्या इतर भागावर पिगमेन्टेशन (रंगद्रव्याच्या थरामुळे त्वचेला आलेला रंग) किंवा त्वचेवर गडद रंगाचे चट्टे पडू शकतात. रक्तातील इन्सूलिन (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) संप्रेरक खूप जास्त होण्यामुळे असे होऊ शकते, ताबडतोब एखाद्या स्त्रीरोगतज्ञाशी सल्लामसलत करावी.


6) वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे):
वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे) म्हणजे गर्भधारणा होण्यास त्रास होणे (गर्भावस्था). पीसीओएस हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक सामायिक कारण आहे. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता किंवा ती न येणे हे बहुतेक वेळा ओव्हुलेशन न होण्याशी संबंधित आहे (अंडाशयात अंडी तयार होणे आणि ती मुक्त होणे), ज्यामुळे गर्भधारणा होण्याची किंवा गरोदर राहण्याची शक्यता कमी होते.
तुम्हाला गर्भधारणा होण्यास त्रास होत असल्यास, आपल्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या. कारण तुम्हास पीसीओएस असू शकतो.
+ पीसीओएससाठी योग्यवेळी उपचार न घेतल्यास काय परिणाम होतात?
पीसीओएस बद्दल समजून घेण्याची गरज असणारी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त कॉस्मेटिक किंवा मासिक पाळीची समस्या नाही. ते अनेक दीर्घकालीन समस्या निर्माण होण्याच्या जोखमीशी निगडित असू शकते. पीसीओएस असलेल्या महिलेने लक्षणे नाहिशी झाली तरी सुद्धा रजोनिवृत्तीपर्यंत तिच्या आरोग्याची स्त्रीरोगतज्ञाद्वारा नियमित पद्धतीने तपासणी करून घेणे महत्त्वाचे असते.

उपचार न केलेल्या पीसीओएस असलेल्या महिलेला खालील स्थिती किंवा रोग होण्याची जास्त जोखीम असते:
 • वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे)/गरोदर राहता न येणे
  अगोदरच चर्चा केल्याप्रमाणे, पीसीओएस हे वंध्यत्वाचे किंवा गरोदर राहता न येण्याचे सामायिक कारण आहे. अशा प्रकारे वंध्यत्वाची भविष्यातील जोखीम टाळण्यासाठी पीसीओएसचे लवकर निदान करणे अत्यावश्यक आहे.
 • मधुमेह
  पीसीओएस असलेल्या सुमारे 50% महिलांना 40 वर्ष वय होण्यापुर्वी मधुमेह होतो किंवा मधुमेहपूर्व स्थिती होते. त्यामुळे, तुम्हाला पीसीओएस असल्यास, मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम करण्याची आणि खाण्याच्या सवयीत बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. • रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे आणि हृदयाशी संबंधित रोग
  पीसीओएस असलेल्या महिलांना रक्तातील कोलेस्टेरॉल जास्त वाढण्याची अधिक शक्यता असते. हृदयाशी संबंधित रोग हा कोलेस्टेरॉलशी अधिक संबंधित असल्यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये अशा समस्या (हृदयाचा झटका) होण्याची जोखीम वाढू शकते. • गर्भावस्थेतील किचकट समस्या
  पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये गर्भावस्थेच्या दरम्यान किचकट समस्या होण्याची अधिक शक्यता आहे. ह्यात बाळाचा खूप लवकर जन्म होणे किंवा गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे (प्री-एक्लॅम्पसिया) किंवा गर्भावस्थेदरम्यान मधुमेह होणे, यांचा समावेश होतो. तुम्हाला पीसीओएस असल्यास तुम्ही नियमित पद्धतीने तुमची तपासणी करून घ्यावी..


 • एन्डोमेट्रिअल कर्करोग/गर्भाशयाचा कर्करोग
  पीसीओएस असलेल्या महिलेची मासिक पाळी अनियमित असणे किंवा मासिक पाळी येत नाही. यामुळे, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची अधिक जोखीम असू शकते.
त्यामुळे, तुम्हाला पीसीओएस आहे अशी तुम्हाला शंका जरी आली तरीही कृपया तुमच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ह्या लहानसहान तक्रारींच्या पलिकडे विचार करण्याची आणि पुढील शक्यता असलेल्या आरोग्याच्या समस्यांची तीव्रता जाणून घेण्याची तातडीची गरज आहे.

+ पीसीओएसची कारणे काय आहेत?
आपल्याला आता माहित आहे की पीसीओएस हा अनेक कारणांमुळे होणारा रोग आहे. पीसीओएसची संभाव्य कारणे खाली देण्यात आली आहेत:
 • जीवनशैलीतील बदल: आरोग्यास अपायकारक असलेले जंक फुड खाणे आणि व्यायाम न करणे यामुळे महिलांचे वजन वाढते. लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यामुळे संप्रेरकांचा असमतोल होतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो.
 • इन्सूलिनला (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याला) प्रतिकार 50-80% घटनांमध्ये इन्सूलिनचा (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याचा) प्रतिकार हे महत्त्वाचे कारण असते. ह्यामुळे देखील महिलांचे वजन अधिक वाढते, ज्यामुळे पीसीओएसच्या लक्षणांची स्थिती अधिक खराब होते.
 • संप्रेरकांचा असमतोल: ठराविक संप्रेरकांचा असमतोल हे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये सामायिक कारण आहे.
 • कौटुंबिक इतिहास: एखाद्या महिलेची आई, मावशी किंवा बहिणीला पीसीओएस असल्यास/झाला असल्यास तिला तो होण्याची अधिक शक्यता असते.

+ डॉक्टरांकडे कधी जावे?
तुम्हाला पुरळ/मुरूमे, किंवा हर्सुटिजम (मुख्यत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) यांसारखी पीसीओएसच्या कोणत्याही एका किंवा अधिक लक्षणांचा त्रास असल्यास, कृपया जवळपासच्या सल्लागाराची (स्त्रीरोगतज्ञाची) भेट घ्या. कारण, पीसीओएसमुळे अनेक दीर्घकालीन समस्या होण्याची जोखीम वाढू शकते उदा. वंध्यत्व (अपत्यास जन्म देऊ न शकणे), मधुमेह, हृदयाशी संबंधित रोग आणि गर्भावस्थेतील किचकट समस्या वगैरे.

पीसीओएसचे लवकर निदान केल्यास त्यामुळे तुम्हाला भविष्यात वंध्यत्वसारख्या (अपत्यास जन्म देऊ न शकणे यासारख्या) दीर्घकालीन समस्या होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे, खूप उशीर होण्यापुर्वी उपाय करा.

+ पीसीओएस वर कोणते उपचार आहेत?
पीसीओएसचे व्यवस्थापन करण्याचे अनेक मार्ग आहेत. लक्षणांच्या तीव्रतेवर व्यवस्थापनाचे पर्याय अवलंबून असू शकतात.

जीवनशैलीत सुधारणा:

पीसीओएस असलेल्या महिलांसाठी, जीवनशैलीत आरोग्यसंपन्न बदल करण्यामुळे स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय मदत होऊ शकते. अशा प्रकारे पीसीओएस असलेल्या सर्व महिलांसाठी, तुम्ही लठ्ठ असलात किंवा सडपातळ तरी सुद्धा जीवनशैलीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

आरोग्यसंपन्न आहाराचा वापर केल्यास, त्यामुळे तुम्हाला पोषक द्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा आरोग्यसंपन्न आहार मिळत आहे याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे तुमची मधुमेह आणि हृदयाशी संबंधित रोग यासारख्या रोगाची जोखीम कमी होऊ शकते.

कमी जीआय असलेला आहार घ्या: कमी ग्लायसेमिक इन्डेक्स (जीआय) असलेले पदार्थ खाण्यामुळे ती व्यक्ती तिच्या रक्तशर्करेचा अधिक चांगला समतोल राखू शकते आणि पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा करू शकते. कमी जीआय असलेल्या पदार्थांमध्ये आख्खे धान्य, मेद नसलेली (लीन) प्रथिने, दाणे आणि बिया, आणि भरपूर ताजी फळे आणि पिष्टमय नसलेल्या भाज्या, यांचा समावेश होतो. तुमच्या खास गरजेनुसार कोणते पदार्थांचे पर्याय सर्वोत्कृष्ट आहेत हे जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर किंवा पोषकतज्ञ यांच्याशी चर्चा करण्याची खात्री करून घ्या. कमी चरबी असलेला आहार घेण्याचा देखील सल्ला देण्यात येत आहे.

एकावेळी कमी खा, दिवसातून जास्त वेळा खा: दिवसातून अधिक कालांतराने कमी प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे तुमच्या रक्तशर्करेचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते. तुम्ही दर 3-4 तासांनी खाण्याची आखणी करावी.भरपूर पाणी प्या: इन्सूलिनला (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याला) होणाऱ्या प्रतिकारामुळे, पीसीओएस असलेल्या महिलेला पाण्यामुळे वजन वाढल्याचे किंवा जलद शरीरातील पाणी मोठया प्रमाणात कमी होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, तुम्ही दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे.शारीरिक कार्यक्षमता किंवा व्यायाम: त्यामुळे तुमची उत्साहाची पातळी वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा तणाव कमी होतो. वजन कायम राखण्यास मदत होण्यासाठी मार्गदर्शक प्रणालीनुसार दररोज 30 ते 60 मिनिटांचे शारीरिक कामकाज करण्याचा सल्ला देण्यात येतो. दररोज दिवसातून किमान 90 मिनिटे व्यायाम करण्याचे सुचविण्यात येते.

केवळ आहाराच्या तक्त्याचे पालन करण्यापेक्षा आहारासह शारिरीक कामकाज किंवा व्यायामात बदल करणे, यांची सांगड घातल्यास त्यामुळे वजनाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकते.

पीसीओएस असलेल्या लठ्ठ आणि अधिक वजन असलेल्या ज्या महिला वजन कमी करतात आणि निरोगी जीवनशैलीचा वापर करतात त्या त्यांच्या मधुमेह आणि हृदयाशी सबंधित रोगांसारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांची जोखीम फार मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात.

औषधोपचार:

तुम्हाला पीसीओएस असल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला इन्सूलिन (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) कमी करणारे औषधोपचार जसे मायो-इनोसिटॉल आणि मेटफॉर्मिन, पुरूषांच्या संप्रेरकविरोधी औषधोपचार, गर्भनिरोधक गोळ्या, अंडमोचनाला चालना देणारे औषधोपचार, पूरक जीवनसत्त्व डी वगैरे घेण्यास सांगण्याची शक्यता आहे. रूग्णाने वरील उपचारपद्धतींना प्रतिसाद दिला नाही तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्याची देखील शक्यता आहे.

कृपया कोणतेही औषधोपचार घेण्यापुर्वी तुमच्या जवळच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या.
Social   |     |     |